सोऽहम् - C'est Moi

र्पुथ्वीतलावरील माझे विचार आणि श्रद्धा.
Some thoughts and beliefs of my life on planet Earth.

Wednesday, September 07, 2005

गणपती बाप्पा मोरया!

दर वर्षी ज्याची आख्खा महाराष्ट्र वाट पहातो, त्या गणपती बाप्पाचे उंदिरमामावर बसून आगमन झालेय. आबालव्रुद्धांना विविध कारणांसाठी आवडणारा हा सण मला आवडतो तो मोदकांसाठी. मोदकांच्या नुसत्या आठवणीने माझ्या तोंडाला पाणी सुटलेय. काल रात्रीच मी मोदक बनवून ठेवलेत (देवा, गोड मानून खा रे बाबा... ;) ). आता कधी एकदा घरी जातोय आणि गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करून मोदकांवर ताव मारतोय असे झालेय मला. अमेरिकेत गणेश चतुर्थीची सुट्टी का नाही देत बरे? (अर्थात भारतीय सणांना सुट्टी मिळायला मी काही भारतात नाहीये म्हणा. पण दिलीच सुट्टी कोणी तर नको कोण म्हणणार?)


Ganpati at Apt #1410 Posted by Picasa



व्येंकीशी काही दिवसांपुर्वीच ओळख झालीये. काय amazing cook आहे तो. क्रुष्णजन्माष्टमीला त्याने एकुण ११ पक्वान्ने बनवली होती आणि ती ही right from the scratch... I mean no packaged / instant things. आहाहा... गुलाबजाम, बालुशाही, म्हैसूरपाक, खिर (पायसम्)... अगदी त्रुप्त झालो मी त्या दिवशी. आज पुन्हा त्याच्याच घरी जेवण आहे संध्याकाळचे. Why do they have to keep classes in the evenings? Idiots...आणि मला वाटते जगातल्या सगळ्या घड्याळ्य़ांनी आज संप पुकारलाये. किती हळू हळू सरकताहेत काटे पहा... नेमक्या weekend ला ही मंडळी आता घाई करणार. Meeting आहे ना सोमवारी माझी prof बरोबर...

3 Comments:

Post a Comment

<< Home

 
eXTReMe Tracker Listed on BlogShares