सोऽहम् - C'est Moi

र्पुथ्वीतलावरील माझे विचार आणि श्रद्धा.
Some thoughts and beliefs of my life on planet Earth.

Tuesday, March 18, 2014

फिटे अंधाराचे जाळे


फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास

दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापुर्वीचे पालटे जग उदास उदास

झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास
--

Music Director: श्रीधर फडके 
Vocals: आशा भोसले - सुधीर फडके 
Lyrics: सुधीर मोघे
 
StatCounter - Free Web Tracker and Counter eXTReMe Tracker Listed on BlogShares